ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ५ (अंतिम भाग)

१८ जुलै २०२०.  आज सकाळी बरोबर दहा वाजता जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स रुम मध्ये पुन्हा एकदा डॉक्टर लक्ष्मी आल्या होत्या.  टीव्हीवरच्या वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जमा झाले होते. "गुड मॉर्निंग. " नेहेमी प्रमाणेच डॉक्टर लक्ष्मींनी बोलायला सुरुवात केली. "आपल्या सगळ्यांचं जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत.  आजची आपली ही सभा … Continue reading ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ५ (अंतिम भाग)

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ४

६ जुलै २०२०.  बरोबर सकाळी १० वाजता डॉक्टर लक्ष्मींनी मायक्रोफोनमध्ये बोलायला सुरुवात केली. "मित्रहो, गुड मॉर्निंग.  पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत.  पाच दिवसांपूर्वी आपण ही परिषद थांबवली त्या दिवशी चीननं ग्रिफ्त्शियाच्या उत्खननासाठी दोन विशिष्ठ जागांवर सामुद्रीय तळ उकरण्याची मागणी केली होती.  या संदर्भात मागच्या चार दिवसात खूप चर्चा घडल्या.  तुमच्या पैकी बऱ्याचशा जणांनी इमेलद्वारे आपापल्या देशांची … Continue reading ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ४

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ३

सामुद्रीय जीवशास्त्रज्ञ सिल्व्हिया अर्लनि काही मोजक्याच पत्रकारांना तातडीनं घरी बोलावलं. सिल्व्हिया अर्ल.  वय वर्षे ८५.  सामुद्रीय जीवशास्त्रातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या शास्त्रज्ञ, लेखिका आणि वक्त्या.  २५ - ३० राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि शंभरच्यावर प्रकशित साहित्य त्यांच्या नावावर जमा होतं. "तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती नसेल परंतु चीननं आज एक मोठी आगळीक केली आहे.  कोव्हिड १९ साठी औषध तयार करण्याच्या नावाखाली प्रशांत आणि हिंदी महासागरातल्या सगळ्यात मोठ्या प्रवाळ भिंती नष्ट करण्याचा त्यांनी घाट घातला आहे."  … Continue reading ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – ३

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – २

बरोबर सकाळी दहा वाजता टेलिकॉन्फरन्स पुन्हा सुरू झाली.  सगळे सभासद टीव्हीच्या पडद्यावर हजर झालेलेच होते. "गुड मॉर्निंग. " सुरूवात कालच्या प्रमाणेच आजही डॉ लक्ष्मींनीच केली.  "आपल्या परिषदेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.  आज आपण सकाळच्या सत्रात चीनचं प्रेझेंटेशन बघणार आहोत.  त्यानंतर दुपारच्या सत्रात जर्मनी आणि इस्राएल यांची प्रेझेंटेशन्स आहेत.  मी काल म्हटल्याप्रमाणे चीनला या परिषदेद्वारा जागतिक समुदायां … Continue reading ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – २

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – १

(मित्रहो माझी मराठीतली एक नवीन लघु कथा आजपासून इथे टाकत आहे.  अर्थात लघु म्हटली तरीही ही बऱ्यापैकी दीर्घ आहे, त्यामुळे ती पाच भागांमध्ये विभागून टाकत आहे.  कथा आवडली, नाही आवडली किंवा तुमचा जो काय अभिप्राय असेल तो जरुर सांगा.  आणखी एक म्हणजे, मला मराठी टंकलेखनाची फारशी सवय नसल्यामुळे (आणि सध्या बाहेरून काम करुन घेता येत नसल्यामुळे), यात शुद्धलेखनाच्या काही चुका राहिल्या … Continue reading ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग – १